Drugs Seized in Margao
Drugs Seized in Margao Dainik Gomantak
गोवा

Drugs Seized in Margao: मडगाव रेल्वेस्थानकावर गांजा बाळगल्याप्रकरणी संशयिताला अटक

सुशांत कुंकळयेकर

Drugs Seized in Margao

मडगाव रेल्वेस्थानक परिसरात गांजा बाळगल्या प्रकरणी मुरुगुराज दिनेश याला अटक करण्यात आली. कोकण रेल्वे पोलिस व मडगाव रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई करत संशयिताकडून ३ किलो गांजा जप्त केला. त्‍याची आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत ३ लाख रुपये एवढी किंमत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव रेल्वेस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्‍या एका युवकाला मडगाव रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी थांबवले. त्याची चौकशी केली असता त्याने उलटसुलट उत्तरे दिली.

संशयिताला रेल्वे सुरक्षा दलाकडून पुढील तपासासाठी कोकण रेल्वे पोलिसांकडे देण्यात आल्यानंतर संशयितांला दम भरताच त्याच्याकडे अमलीपदार्थ असल्याचे सांगितले. कोकण रेल्वे पोलिसांनी संशयिताकडून ३ किलो गांजा जप्त करण्यात आला.

संशयितावर गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली. ही कारवाई कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर व रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक विनोद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक लखन सिंग, पोलिस कॉन्स्टेबल प्रवेश कुमार व विक्रमजित यांचा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT