पणजी : कुजिरा-सांताक्रुझ परिसरातील बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी संशयित मनदीप कुमार (24, उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे, मात्र चोरीस गेलेल्या ऐवज अजून मिळालेला नाही.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पेद्रो दुमिंगो जोझ लॉरेन्सो (74) हे तक्रारदार आहेत. चोरट्यांनी घराचे मुख्य दार तोडून आत प्रवेश केला व आतील कपाटांची कुलुपे तोडून एक सोन्याची बांगडी, एक नेकलेस, दोन जोडी कर्णफुले व चार घड्याळे मिळून 1 लाख 96 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
तक्रारदार घर बंद करून बाहेर गेले होते. संध्याकाळी परत आल्यावर दार उघडे दिसले. त्यामुळे ही चोरी दुपारी झाल्याची शक्यता आहे.
दिवसाढवळ्या घरफोडीचे प्रकार
गेल्या काही दिवसांपासून आगशी व सांताक्रुझ परिसरात बंद असलेली घरे, बंगले तसेच फ्लॅटमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या चोऱ्या दिवसाढवळ्या होत असल्याने नोकरीधंद्यानिमित्त दिवसभर घराबाहेर असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस दिवसा गस्त घालत नसल्याने लोक संताप व्यक्त करीत आहेत. गोवा वेल्हा व बांबोळी भागातही चोरट्यांचा सुळसुळाट झालेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.