Goa Crime Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! बिहारच्या मुलीची गोव्यात आत्महत्या; बॉयफ्रेंडसोबतच्या वादानंतर संपवले जीवन

कळंगुट येथील डोंगरपुर येथे एक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Kavya Powar

कळंगुट येथील डोंगरपुर येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार ही महिला मूळची बिहारची असून तिचे नाव संजना सिन्हा (30) असल्याचे सांगण्यात येत आहे. संजनाचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत काही कारणांवरून वाद झाले होते. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

आज (8 जून) काही वेळापूर्वी तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ती बराच वेळ दार उघडत नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खिडकी उघडून पहिले असता संजनाने गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर शेजाऱ्यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावण्यात आले. रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. पोलीस संबंधित घटनेचा पंचनामा करत आहेत.

दरम्यान, तिच्या बॉयफ्रेंडचा पोलीस शोध घेत असून मृत्यूमागील नेमके कारण काय याचाही तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

SCROLL FOR NEXT