Pratapanagar crime Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: अवघ्या 24 तासांत बंगळुरूमधून संशयित ताब्यात, प्रतापनगर - धारबांदोडा खून प्रकरणी पोलिसांना मोठे यश; बॅगमध्ये सापडला 'महत्वाचा' पुरावा

Dharbandora Murder Case: या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे

Akshata Chhatre

Goa Murder Mystery: प्रतापनगर, धारबांदोडा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने सोमवारी (दि.१६) सकाळी गोव्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मयत मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असलेल्या या मृतदेहामुळे हे प्रकरण खुनाचे असल्याचा संशय बळावला आणि अवघ्या २४ तासांत संशयिताला बंगळूरुमधून ताब्यात घेण्यात फोंडा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

प्रारंभिक तपास आणि आव्हान

प्रतापनगर, उसगाव-तिस्क जवळील एका घनदाट जंगलात जंगलात निर्जन ठिकाणी हा मृतदेह आढळल्याने, मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्हेगाराचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा पोलिसांना सकाळी एका महिलेचा मृतदेह सापडल्याचा फोन आला. पोलीस निरीक्षक विजयनाथ कोळेकर आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला.

मृतदेह २५ ते ३० वयोगटातील महिलेचा असावा असा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. गुन्ह्याचे स्वरूप पाहता, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते, आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. अशा घनदाट ठिकाणी मृतदेह कोणी आणि का टाकला असावा, या दिशेने पोलीस तपास करत होते.

पोलिसांची वेगवान कारवाई: संशयित ताब्यात

पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासचक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणामुळे, पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत या प्रकरणातील संशयिताला पकडण्यात करण्यात यश मिळवले आहे. गुन्हेगाराचा माग काढत पोलिसांनी थेट बंगळूरुमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या यशस्वी कारवाईमुळे या रहस्यमय खुनाचे गूढ उकलण्यास मदत होण्याची शक्यता बळावली आहे.

सध्या फोंडा पोलीस या गुन्ह्यामागील नेमके कारण आणि संशयिताचा सहभाग याबद्दल सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

ही तरुणी कोण?

तपासादरम्यान मृतदेहाकडून पोलिसांनी एक बॅग हस्तगत केली. या बॅगमध्ये एक रेल्वे तिकीट आढळून आलेय. या तिकिटावरच्या पत्त्यानुसार ती तरुणी तामिळनाडू येथील असण्याची शक्यता आहे. गावच्या सरपंच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने तिचा खून करून तो मृतदेह जंगलात आणून टाकला असल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'त्यानं' माकडांनाही लावलं पळवून! डोकं हॅंग करणारा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

Shubhanshu Shukla: अभिनंदन! 18 दिवसांचे मिशन पूर्ण करुन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

LA Olympics 2028 Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे वेळापत्रक जाहीर, 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा थरार!

SCROLL FOR NEXT