kidnapping cases goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Crime Case: मागच्या दीड महिन्यात दक्षिण गोव्यात अल्पवयीनांचे अपहरण झाल्याची दहा प्रकरणे नोंद झाली असून या दहाही प्रकरणांचा पोलिसांनी तत्परतेने छडा लावला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मागच्या दीड महिन्यात दक्षिण गोव्यात अल्पवयीनांचे अपहरण झाल्याची दहा प्रकरणे नोंद झाली असून या दहाही प्रकरणांचा पोलिसांनी तत्परतेने छडा लावला आहे.

या घटना जरी अपहरण म्हणून नोंद झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यातील बहुतेक प्रकरणे ही मुलेच घर सोडून पळून जाण्याच्या घटना असून पालक रागावल्यामुळे अशी प्रकरणे घडली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात अशा तीन घटना घडल्या होत्या. वास्को, वेर्णा आणि फोंडा या तीन ठिकाणच्या या घटना होत्या. नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारच्या सात घटना घडल्या, त्यातील तीन घटना मडगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्या तर कोलवा, कुंकळी, केपे आणि वास्को या ठिकाणी प्रत्येकी एक प्रकरण नोंद झाले आहे.

या महिन्यात मडगाव येथे ज्या तीन घटना घडल्या. त्यात पालक रागावल्यामुळे लहान मुले घर सोडून गेली होती, तर वास्को येथील घटना परराज्यात असलेल्या आपल्या आई वडिलांची ओढ लागल्याने एक शाळकरी मुलगा रेल्वेत बसून गेला होता. या सर्व घटनांचा पोलिसांनी इतर राज्यातील पोलिसांच्या मदतीने छडा लावला.

अल्पवयीन मुले घरातून गायब झाल्यास अशी प्रकरणे अपहरण म्हणून नोंद करून तपास करावा अशी मार्गदर्शक तत्त्वे असल्याने ही प्रकरणे तशी नोंद केली जातात, असे पोलिसांनी सांगितले.

वास्कोतील प्रकरणाचा ४८ तासांत छडा

दरम्यान, वास्को येथील अपहरण प्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावल्याबद्दल वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी उपअधीक्षक गुरुदास कदम आणि पोलिस निरीक्षक वैभव नाईक तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News: ZP निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; विजय सरदेसाई, मनोज परब यांच्याशी बोलणी झाली: अमित पाटकर

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

SCROLL FOR NEXT