Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: घरात घुसून कुटुंबीयांना हाकलले; संशयित खुराटेला होणार अटक? बाऊन्सर्सना म्हापसा कोर्टाचा दिलासा

Calangute Crime News: संशयित जनार्दन तुकाराम खुराटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला

Akshata Chhatre

हणजूण: सेंट मायकल वाडा, हणजूण येथे बेकायदेशीररीत्या घरात घुसून ब्रॉन्विन सिनारी कुटुंबीयांना घरातून हाकलून लावल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित जनार्दन तुकाराम खुराटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी (दि. १७) म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला, तर म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने तिघा संशयित बाऊन्सर्सना सशर्त जामीन दिला आहे.

संशयित खुराटे हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे. ज्या पद्धतीने त्याने गुन्हा केला आहे तो जामिनावर सुटल्यास पुन्हा तक्रारदारांना धमकावू शकतो व पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतो. मिळालेल्या जामिनाचा तो गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला जामीन मिळाल्यास पोलिसांना गुन्ह्याचा तपास मुक्त व निष्पक्ष पद्धतीने करता येणार नाही

तपासकामात अडथळा येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याला अटकपूर्व जामीन देणे योग्य होणार नाही. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. तक्रारीला समर्थन देणारे पुरावे गोळा करायचे आहेत व पोलिसांना पुरेसा वेळ मिळायला हवा, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.

सोमवारी संशयित आरोपी राकेश नंदकिशोर राहा (३६, रा. साखळी व मूळ उत्तरप्रदेश), परशुराम शंकर गावस (४२, रा. वाडी नादोडा, बार्देश) व विकी विजय नाईक (२०, इल्हास, जुने गोवे) या तिघांचा जामीन अर्जावर सुनावणी होऊन म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने तिघांचीही सशर्त जामिनावर सुटका केली. दरम्यान, संशयित जनार्दन खुराटे याच्या अर्जावर सोमवारी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

मायकल पीटर कॅन्सरग्रस्त

इंग्लंड येथील रहिवासी मायकल पीटर यांच्या मालकीचे हणजुण येथे एक घर आहे. हे घर आपण विकत घेतो असे सांगून राजेश सिनारी आणि त्याची बायको त्या घरात राहू लागली. परंतु त्यांच्यामध्ये तसा कसलाच करार झाला नाही. मायकल पीटर याला स्टेज चारचा कॅन्सर असून त्याला पैशांची गरज आहे. म्हणूनच त्यांनी जनार्दन खुराटे यांना हे घर विकण्यास सांगितले.

त्यानुसार ज्यावेळी जनार्दन खुराटे यांनी सिनारी यांना घराबाहेर जाण्यास सांगितले असता सिनारी यांनी घर सोडण्यास नकार दिला. त्यानंतर जनार्दन यांनी सिक्युरिटी एजन्सीचा वापर करून घर खाली केले. सिनारी यांनी जनार्दन यांच्या विरुद्ध घर बळकावणे आणि चोरीची तक्रार दाखल केली असल्याने जनार्दन यांची पत्नी जान्हवी खुराटे त्या घरातील सगळे समान घेऊन क्राईम ब्रांच मध्ये दाखल झाल्या.

काय म्हणाल्या जान्हवी खुराटे?

जान्हवी खुराटे यांच्या म्हणण्यानुसार घराचे खरे मालक मायकल पीटर यांनी त्यांच्यावर घराची जबाबदारी सोपवली होती. ब्रॉन्विन सिनारी यांनी अर्धी रक्कम भरून चावी घेऊन तिथून पळ काढला होता. यानंतर मायकल पीटरचा सांगण्यावरून जनार्दन खुराटे घरात चौकशी कारण्यासाठी सिक्युरिटी एजन्सीसह तिथे गेला असता घरात कुणीही नव्हतं. घरातलं सामान व्यवस्थित बाजूला काढून ठेवण्यात आलं, मात्र तीन दिवस कुणीही फिरकलं देखील नाही.

पोलीस स्थानकात ब्रॉन्विन सिनारी यांनी जनार्दन यांना धमकावलं आणि त्यांच्यावर घरातून हाकलून लावल्याचा आरोप लावला. जान्हवी खुराटे यांच्या म्हणण्यानुसार घरात असलेल्या सफाई कर्मचारी महिलेला सुखरूप घरी सोडण्यात आलं होतं, मात्र तरीही सिनारी कुटुंबाने त्यांच्यावर अपहरणाचा आरोप लावला आणि परिणामी जनादर्न यांचा जमीन फेटाळून लावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT