Crime|Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवत महिलेला 15 लाखांचा गंडा, पोलीस कर्मचाऱ्यास अटक; फोंड्यातील घटना

Goa Government Job: शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 15 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सागर सुरेश नाईक असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे.

Manish Jadhav

सरकारी नोकरी मिळवणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. काही तरुण खूप कष्टानं सरकारी नोकरी मिळवतात तर काहीजण शॉटकटच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच फसतात. असाच काही प्रकार कुर्टी, फोंडा येथून समोर आला आहे. शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल 15 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सागर सुरेश नाईक असे फसवणूक करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. फोंडा पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

कोट्यवधींचा गंडा!

काही दिवसांपूर्वी, नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरुन एका महिलेने डिचोलीतील अनेकांना कोट्यवधी रुपयांना टोपी घातल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा कोट्यवधींचा गंडा पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेच्या साथीने घातल्याचे कटु सत्य समोर आले होते. संशयित महिलेच्या आमिषाला बळी पडलेल्या पीडितांनी डिचोली पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी फरार महिलेसह तिचा साथीदार पोलिस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा नोंद केला. संशयित महिलेने डिचोलीतील काही महिला मिळून 20 हून अधिकजणांना पाच कोटींपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ही महिला डिचोलीत एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये राहात होती.

कॉन्स्टेबल ‘मास्टरमाईंड’

या प्रकरणात एक पोलिस कॉन्स्टेबल 'मास्टरमाईंड' असल्याची माहिती समोर आली होती. या कॉन्स्टेबलने संशयित महिलेला डिचोलीत फ्लॅट मिळवून दिला होता. या महिलेच्या आमिषाला बळी पडलेल्या काहीजणांकडून या कॉन्स्टेबलने पैसे घेतल्याची माहिती समोर आली. पोलिस म्हटल्यावर अनेकांनी त्याच्यासह त्या महिलेवरही विश्वास ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT