Goa Crime : Exposure of prostitution by crime branch in goa

 

Dainik Gomantak

गोवा

वेश्‍‍याव्‍यवसायाचा पर्दाफाश,गोव्यात क्राईम ब्रँचची कारवाई..

मेरशी जंक्शनजवळ कारवाई; दोन युवतींची सुटका

दैनिक गोमन्तक

Goa Crime : मेरशी जंक्शनजवळ काल रात्री उशिरा गुन्हा अन्‍वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने (Crime Branch of Crime Investigation Department) वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश (Prostitution exposed) करताना दोन युवतींची सुटका केली तर प्रिया विलास पोवार (28, मुंबई) या दलाल महिलेस अटक केली आहे. संशयित महिला पीडित युवतींना दुचाकीवरून घेऊन आली होती. ती दुचाकीही जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली. सुटका केलेल्‍या युवतींची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

क्राईम ब्रँचच्या (Crime Branch) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बोगस ग्राहक (Customer) पाठवून करण्यात आली. या बोगस ग्राहकामार्फत वेश्‍याव्यवसायात असलेल्या दलाल महिलेशी संपर्क करण्‍यात आला. तिने त्यासाठी रक्कम ठरविली. या ग्राहकाला 500 रुपयांच्या दोन नोटा देऊन त्या दलाल महिलेला भेटण्यास पाठवण्यात आले. तिने मेरशी जंक्शनजवळ (Merces Junction) येण्यास सांगितल्याने पोलिसांनी त्या परिसरात सापळा लावला. रात्री पावणेदहाच्या सुमारास मेरशी जंक्शनजवळ दुचाकीवरून तिघेजणी आल्‍या. त्यातील चालक असलेल्या महिलेने ग्राहकाशी संपर्क साधला. ग्राहक त्या दुचाकीपाशी गेला व त्या महिलेकडे 500 च्या दोन नोटा दिल्या. सापळा लावून असलेल्या क्राईम ब्रँचच्या पथकाने या दलाल महिलेला घेरले. कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. संशयित प्रिया पोवार हे मूळची अंधेरी-मुंबई येथील असून ती मिरामार येथे एका फ्लॅटमध्ये भाडेपट्टीवर राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT