Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्यात रात्रीच्या वेळी समुद्रकिनारे झाले शांत; मात्र पोलिस लागले डोळे चोळू!

Goa Beach: गोवा किनाऱ्यांवर शांतता दिसून येत असून तेथील ग्रामस्‍थांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी न्यायालयाने रात्री 10 वाजल्यानंतर खुल्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. त्‍यामुळे सासष्टीतील अनेक समुद्रकिनांऱ्यावर पहाटेपर्यंत सुरू असलेल्या संगीत रजनी पार्ट्यांचे आयोजन आता बंद झाले. त्‍यामुळे रात्री 10 नंतर किनाऱ्यांवर शांतता दिसून येत असून तेथील ग्रामस्‍थांनी समाधान व्यक्त केले आहे. न्‍यायालयाने बडगा दाखविल्‍यानंतर आता पोलिसही सतर्क होऊन कामाला लागले आहेत.

कोलवा किनाऱ्याजवळ राहत असलेल्या नॉबर्ट फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या किनाऱ्यावरील अनेक रेस्टॉरंट्‌स, हॉटेल्‍समधून पहाटेपर्यंत ध्‍वनिप्रदूषण होत होते. त्‍यामुळे झोपमोड होत होती. शिवाय आजारी माणसांना खूपच त्रास व्‍हायचा. आता मात्र रात्री येथे शांतता पसरलेली असते.

बेताळभाटी येथील ॲण्‍ड्रू डायस म्हणाले, या किनाऱ्यावर सायंकाळी 7 वाजल्यापासून पार्ट्या सुरू व्‍हायच्‍या. र्हा आवाज एवढा मोठा असायचा की खिडक्यांची दारे हलायची. रात्रीची झोप तर दुर्मीळ झाली होती. गेल्‍या दोन-तीन दिवसांत मात्र दिलासा मिळाला आहे.

तर, केळशी येथील दुमिंग नोरोन्हा यांनी सांगितले की, या किनाऱ्यावरही रात्रीचा धूमधडाका सुरू असायचा. मात्र आता तो बंद झाला आहे. न्‍यायालयाच्‍या निर्णयाने आम्‍हाला सुखाची झोप मिळाली आहे.

थेरॉन डिकॉस्‍टा, कोलवा पोलिस निरीक्षक-

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील शॅक, निवासी हॉटेल्‍स, बारमालक व संबंधितांची बैठक बोलावून पार्ट्या रात्री 10 वाजेपर्यंत बंद करण्याचे सूचित केले आहे. शिवाय सर्व ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्‍त वाढविण्‍यात आल आहे. मागील दोन दिवसांत एकही तक्रार पोलिस स्थानकात दाखल झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्‍यू; फांद्या छाटताना 'कटर'चा विद्युतभारीत वाहिनीला स्‍पर्श, अस्‍नोड्यातील दुर्घटना

ED Raid: गोव्यासह भारत, 'यूएसए'मधील 112.90 कोटींची मालमत्ता जप्त; 'लील इलेक्ट्रिकल्स' मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई

Horoscope: शनिदेवाची विशेष कृपादृष्टी! शनिवार अनेक राशींसाठी भाग्यवर्धक; करिअर, शिक्षण आणि व्यवसायात मिळणार मोठा लाभ

SCROLL FOR NEXT