Gold at Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: ‘मोपा’वर 3.92 कोटींचे सोने जप्त! केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई

Manohar International Airport: डीआरआयची कारवाई: अबुधाबीहून आलेल्या तिघा प्रवाशांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Manohar International Airport: केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबुधाबीहून आलेल्या परप्रांतीय तिघा प्रवाशांना अटक केली.

त्यांच्याकडून 3.92 कोटींचे 5.7 किलो सोने व आयफोन कंपनीचे 29 मोबाईल संच जप्त केले.

या तिघांविरुद्ध तस्करीप्रकरणी सीमा शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

हे विमानतळ सुरू झाल्यापासूनची डीआरआयची सोने तस्करीप्रकरणीची ही पहिली कारवाई आहे.

केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावर अबुधाबीहून येणाऱ्या विमानात तीन प्रवासी सोन्याची तस्करीत गुंतले असल्याची व त्यांच्या वर्णनाची माहिती मिळाली होती.

त्यामुळे डीआरआय अधिकाऱ्यांनी काल विमानतळावर सापळा रचला होता. अबुधाबीहून आलेले इंडिगोचे विमान मोपा विमानतळावर उतरताच त्यातून आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती.

यावेळी बाला पटेल ऊर्फ मोहम्मद इरफान गुलाम नबी (वय ३७), उत्तर प्रदेश येथील इरफान (वय ३०) व मुंबई येथील कामरान अहमद खान (वय ३८) या तिघांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडे असलेल्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अबुधाबीहून आलेल्या तिघा प्रवाशांना ताब्यात घेऊन सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या तिघांना तपासणीसाठी विशेष कक्षात घेऊन जाण्यात आले.

तेथे त्यांच्या परवानगीनुसार त्यांच्या बॅगा खुल्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता पेस्ट स्वरूपातील सोने सापडले. ही सोन्याची तस्करी ते कोठे करणार होते याचा तपास डीआरआयचे अधिकारी करत आहेत.

पेस्ट स्वरूपात आणले होते सोने

अबुधाबीहून आलेल्या प्रवाशांनी सोन्याची पेस्ट करून ते कंपाऊंड फॉर्ममध्ये कमरपट्ट्यामध्ये तसेच कपड्यांच्या आतील बाजूने आतील थर करून शिवण्यात आले होते. या सोन्याच्या थरासह हे कपडे त्यांच्या बॅगेमध्ये ठेवण्यात आले होते.

5.7 किलो सोने!

या प्रवाशांच्या बॅगेतील कपड्यांमधील पँटची तपासणी केली असता आतील बाजूने पिवळ्या रंगाचे थर आढळून आले. हे थर सोन्याच्या पेस्टचे होते. तपासणीनंतर या सोन्याच्या पेस्टचे वजन केले असता ते 5.7 किलो आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT