Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: बंद घरे हेरून फोडणारा अट्टल गुन्हेगार चिमा पॉलला साथीदारासह अटक

Goa Crime News: फातोर्डा पोलिसांची मोठी कारवाई

Ganeshprasad Gogate

Goa Crime News: बंद घरे हेरून ती फोडण्‍यात हातखंडा असलेला अट्टल घरफोड्या चिमा पॉल आणि त्‍याचा साथीदार अर्जुन देसाई या दोघांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली असून त्‍यांच्‍याकडून लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्‍त केले आहेत.

4 डिसेंबर रोजी फातोर्डा येथे राहाणाऱ्या डेबोरा फर्नांडिस यांच्‍या घरी ही चोरी झाली होती. त्‍यात या दोघांनी मिळून 50 लाखांचे सोन्‍याचे दागिने पळविले होते.

यातील चिमा पॉल याला नागपूर येथे तर अर्जुन देसाई याला मडगावातून अटक केल्‍याची माहिती फातोर्डा पोलीस स्‍थानकाचे निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली. यापूर्वी चिमा पॉल याने अशाचप्रकारे कुडचडे येथील एका लग्‍नाचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने पळविले होते.

फातोर्डा येथे झालेली चोरी आणि कुडचडे येथील चोरी यांच्‍या कार्यपद्धतीत साम्‍य दिसून आल्‍याने पोलिसांनी चिमाचा शोध घेण्‍यास सुरुवात केली असता तो नागपूर येथे असल्‍याची माहिती मिळाली.

फातोर्डा पोलिसांनी नागपूर येथे जाऊन चिमाला अटक केल्‍यानंतर त्‍याने या चोरीत आपल्‍याबरोबर अर्जुनही सामील असल्‍याचे सांगितले. काल पोलिसांनी अर्जुन यालाही ताब्‍यात घेतले.

शुक्रवारी त्‍यांना रिमांडसाठी न्‍यायालयासमोर हजर केले. या प्रकरणात चोरीला गेलेले बहुतेक दागिने पोलिसांना सापडले असून दोन्‍ही चोरट्यांनी ते दागिने आपापल्‍या घरात ठेवले होते. मात्र, काही दागिने अजून हस्‍तगत करण्‍याचे बाकी आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT