Shivani Rajawat Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : नौदलाच्‍या अधिकाऱ्यांवरही दबाव आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू; वास्‍को जळीतकांड

Goa Crime News : शिवानीच्‍या भावाचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News : मडगाव, शिवानी राजवत आणि तिची आई जयदेवी चौहान यांच्‍या मृत्‍यू प्रकरणात जी पाेलिस चौकशी चालू आहे, त्‍यात व्‍यत्‍यय आणण्‍याचा प्रयत्‍न चालू असून नौदलाच्‍या काही अधिकाऱ्यांवर खोटी जबानी देण्‍यासाठी दबाव आणला जात असल्‍याचा आरोप शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान यांनी केला आहे.

या प्रकरणात अटक करण्‍यात आलेला नौदल अधिकारी असलेला शिवानीचा पती अनुराग राजवत याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी घेताना आपली बाजू ऐकून घ्‍यावी यासाठी शिवानीच्‍या घरच्‍यांकडून न्‍यायालयात हस्‍तक्षेप याचिका दाखल केली जाणार आहे.

१८ नोव्‍हेंबर रोजी नवेवाडे-वास्‍को येथे एका फ्‍लॅटमध्‍ये ही दुर्घटना घडली होती. यावेळी झालेल्‍या गॅस गळतीच्‍या स्‍फाेटात शिवानी आणि तिची आई जयदेवी यांचा भाजून मृत्‍यू झाला होता.

या प्रकरणात वास्‍को पोलिसांनी अनुराग राजवत याच्‍याविरोधात खुनाचा तर अनुरागची आई साधना हिच्‍याविरोधात हुंडाबळीचा गुन्‍हा नोंद केला आहे. अनुरागने आपल्‍याला जामीन मिळावा यासाठी अर्ज केला असून त्‍यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पोलिसांची दिशाभूल करणारी जबानी काही नौदल अधिकाऱ्यांकडून देण्‍यात यावी यासाठी प्रयत्‍न सुरू झाले असून याची माहिती आपल्‍याला नौदलाच्‍याच काही अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे,

अशी माहिती मध्‍यप्रदेश पोलिसांत काम करणारे शिवानीचा भाऊ शुभमसिंग चौहान यांनी ‘गाेमन्‍तक’ला दिली. त्‍या अधिकाऱ्यांनी खाेटी जबानी देण्‍यास नकार दिला असता त्‍यांच्‍यावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न झाला, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT