Goa Crime Brach  Dainik Gomantak
गोवा

सांगोल्डा येथील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; 3 महिलांची सुटका

गोवा गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी ताब्यात

दैनिक गोमन्तक

Goa Crime Brach : गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमली पदार्थांची तस्करी, मद्याचा अवैध साठा, मारामारी, खून आणि अत्याचाराच्या घटना आता रोजच्या बनल्या आहेत. महिलांवर होणारे अत्याचार अजूनही पूर्णपणे थांबले नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना सांगोल्डा येथे घडली आहे. (Goa Crime Branch rescued three women from a sexual workers racket)

गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राइम ब्रॅंच (Goa Crime Branch) पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी काल संध्याकाळी सांगोल्डा येथे वेश्याव्यवसाय प्रकरणी घातलेल्या छाप्यात वेश्या दलाल अफिझ सय्यद बिलाल (37) याला अटक केली आहे. त्याने ग्राहकांना देण्यासाठी आणलेल्या तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या तिन्ही महिला महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील आहेत. यातील एका महिलेने टिव्ही चॅनलवर काम केलेले आहे.

यामध्ये अजूनही महिला अडकल्या आहेत का याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

शेतकऱ्यांसमोर पुन्‍हा एकदा संकट! उरले सुरले पीकही हातचे जाण्याची भीती; म्हैसाळ धरण दुसऱ्यांदा भरले

Super Cup 2025: गतविजेत्या FC Goa चा विजय! जमशेदपूर एफसीला नमविले; सिव्हेरियोचा भेदक गोल

Vasco: '..वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ'! वास्कोतील टॅक्सीचालक आक्रमक; खासगी बसचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

Konkani Language: 'सरकारी नोकरीसाठी ‘कोकणी’ची अट नको'! फोंड्यात धरणे आंदोलन; मराठी राजभाषा निर्धार समितीची मागणी

SCROLL FOR NEXT