Illegal Gambling Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Gambling Goa: होंडा येथे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांना अटक, 52,300 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्यही जप्त

Goa Crime Branch Raid Honda: होंडा येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: होंडा येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५२,३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

या प्रकरणात मुख्य संशयित आणि अड्डा चालवणारा सूर्या पांडुरंग गावकर (वय ४०, होंडा) याच्यासह अन्य आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाळ गावकर (४३, सालेली), गुंडू गावकर (५१, होंडा), दिनेश नाईक (४०, सालेली), राजाराम गावडे (६१, पिसुर्ले), मनोहर गावकर (६२, होंडा), रमेश चारी (५४, होंडा), पांडुरंग गावकर (५०, होंडा) आणि सुनील गोड्याळकर (२४, होंडा) यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व संशयित ‘अंदर-बाहर’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT