Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश! सरकारी खात्यात 5.36 कोटींचा घोटाळा; पश्‍चिम बंगालच्या दोघांना अटक

Goa Samagra Shiksha Scam: पर्वरी पोलिसांनी रॉबिन पॉल, पुरनाशिष साना, आलामिन मोंडल, बिद्याधर मोंडल व सुमांता मोंडल या पाचजणांना पश्‍चिम बंगालमधून अटक केली होती.

Sameer Panditrao

पणजी: गोवा समग्र शिक्षा सरकारी खात्यातून एकूण ५.३६ कोटी रुपयांच्या फसव्या पद्धतीने काढण्याच्या प्रकरणातील घोटाळाप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने पश्‍चिम बंगालमधून मृगांका जोआर्डर (३७) व सुभाशिष सिकदर या दोघांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून मोबाईल फोन व सीमकार्ड ताब्यात घेतले आहे. ५.३६ कोटी रुपयांपैकी १.८ कोटी रुपये बँकेतून हस्तांतर करण्यामागे संशयित सुभाशिष सिकदर हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.

सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी पर्वरी पोलिसांनी केल्यानंतर या घोटाळ्यामागे मोठे रॅकेट गुंतले असल्याचे चौकशीतून उघड झाल्याने हा तपास आता क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे.

पर्वरी पोलिसांनी रॉबिन पॉल, पुरनाशिष साना, आलामिन मोंडल, बिद्याधर मोंडल व सुमांता मोंडल या पाचजणांना पश्‍चिम बंगालमधून अटक केली होती.

संशयित रॉबिन पॉल हा कुशन व्यावसायिक असून त्याला रक्कम हस्तांतर करण्यासाठी मुख्य सूत्रधाराने त्याला कर्ज देण्याचे आमिष दाखवून वापर करून घेतला होता. सध्या तो सशर्त जामिनावर आहे, तर इतर चारजण कोठडीत आहेत. याप्रकरणी क्राईम ब्रँचने आणखी दोघांना अटक केल्याने संशयितांची संख्या ७ वर गेली आहे.

बनावट धनादेशांचा वापर

संशयित सुभाशिष सिकदर हा गोवा सर्व शिक्षा अभियान संस्थेच्या बँक ऑफ इंडिया, पर्वरी शाखेतील खात्यातून १.८ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या काढण्याच्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा सूत्रधार मानला जात आहे. त्याने अलामिन मोंडल नावाच्या एका सहकाऱ्यामार्फत बँक ऑफ बडोदा खात्यात बोगस बँक खाते उघडले व सरकारी निधी काढण्यासाठी बनावट धनादेशांचा वापर केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT