Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात दर आठवड्याला 5 महिला-मुलांवर लैंगिक अत्याचार; 50 टक्के गुन्ह्यांत टीनएजर्स ठरले बळी...

राज्यभरातील 8 शिक्षकांविरूद्ध सहा एफआयआर

Akshay Nirmale

Goa Crime: राज्य सरकारच्या व्हिक्टिम असिस्टन्स युनिट (VAU) च्या अहवालानुसार, गेल्या 09 वर्षांत राज्यात दर आठवड्याला सरासरी 5 महिला आणि मुले लैंगिक अत्याचाराचे बळी ठरले आहेत.

सरासरी दररोज दोन महिला आणि एक अल्पवयीन अशा गुन्ह्यांना बळी पडतात. किशोरवयीन मुले लैंगिक शोषणाचे मुख्य बळी ठरले आहेत, असेही अहवालात नमूद केले आहे.

युनिटने 2014 पासून 2724 प्रकरणे हाताळली आहेत आणि त्यापैकी 70 टक्के प्रकरणे महिलांशी संबंधित आहेत. VAU च्या डेटानुसार गुन्ह्याला बळी पडलेल्या मुलांपैकी जवळपास 50 टक्के मुले ही 0 ते 15 या वयोगटातील आहेत.

इतर प्रकरणांमध्ये घरगुती हिंसाचार, अपहरण, प्राणघातक हल्ला आणि सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे. कथित लैंगिक छळ, विनयभंग, अपमानजनक वर्तन आणि छळाच्या घटनांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

दरम्यान, शाळास्तरपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत राज्यभरातील 8 शिक्षकांविरूद्ध सहा एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

या युनिटमध्ये एक समन्वयक व इतर कामगार आहेत. याशिवाय डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वकील आणि इतर व्यावसायिकांचे एक पॅनेल आहे.

लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना कायदेशीर, भावनिक आणि सामाजिक सहाय्य देण्याचे काम हे युनिट करते.

हे युनिट महिला आणि बाल विकास संचालकांना आणि गोवा राज्य आयोगाला अहवाल सादर करते. बाल न्यायालयाच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT