GCA And MCA MOU  Dainik Gomantak
गोवा

गोवा क्रिकेट असोसिएशन आणि मडगाव क्रिकेट क्लबमध्ये सामंजस्य करार, सर्वव्यापी क्रिकेटला प्राधान्य

किशोर पेटकर

Goa Cricket association And Margao Cricket Club signed MOU: मडगाव परिसरातील क्रिकेटच्या सर्वव्यापी विकासाला प्राधान्य देणाऱ्या सामंजस्य करारावर बुधवारी गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) व मडगाव क्रिकेट क्लब (एमसीसी) यांनी सह्या केल्या. त्यामुळे या भागातील क्रिकेट आणखीनच बहरणार असून त्यादृष्टीने कार्य हाती घेतले जाईल.

एमसीसी आणि जीसीए यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत अत्याधुनिक क्रिकेट मैदान प्रत्यक्षात येईल. अद्ययावत साधनसुविधांनी युक्त असे हे मैदान स्पर्धात्मक सामने, सराव शिबिरे, गुणवत्ता विकास आदींसाठी वापरले जाईल. आधुनिक सुविधा आणि सुविधांनी सुसज्ज असलेले हे मैदान स्पर्धात्मक सामने, प्रशिक्षण सत्रे आणि प्रतिभा विकास कार्यक्रमांसह विविध क्रिकेट उपक्रमांसाठी केंद्र म्हणून काम करेल. त्याद्वारे गोव्यातील क्रिकेटचा दर्जा उंचावताना युवा खेळाडूंच्या प्रतिभेला खतपाणी घातले जाईल, असे नमूद करण्यात आले.

महत्त्वाकांक्षी अकादमीची निर्मिती

जीसीए व एमसीसी यांच्यातील सामंजस्य करार दहा वर्षांचा आहे. या करारानुसार दर्जेदार क्रिकेट अकदमी कार्यान्वित होईल. त्यासाठी जीसीए व एमसीसी एकत्रितपणे कार्य करेल. ही भागीदारी महत्त्वाकांक्षी ठरणार असून युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षणाची संधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच उच्च दर्जात्मक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. अकादमीसाठीची भागीदारी वीस वर्षांची असेल.

गोव्यातील क्रिकेटमधील महत्त्वाचा टप्पा

जीसीए व एमसीसी यांच्यातील सामंजस्य करार राज्यातील क्रिकेटसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘गोव्यातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या उद्दिष्टांतर्गत ही भागीदारी मैलाचा दगड ठरेल. आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यानेराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करू शकेल असे विशेषतः दक्षिण गोव्यातील नवोदित प्रतिभावान क्रिकेटपटू हुडकून त्यांच्या गुणवत्तेला खतपाणी घालणे शक्य होईल.’’

मडगाव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक यांनी या कराराचे स्वागत करताना सांगितले, की ‘‘या सामंजस्य करारावर सही केल्यामुळे मडगाव आणि गोव्यातील क्रिकेटमध्ये नवे युग सुरू झाले आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभणे हा आमचा सन्मान आहे. एकत्रितपणे भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारी क्रिकेट संस्कृती आम्ही निर्माण करू याचा आम्हाला विश्वास वाटतो.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT