Health Minister Vishwajeet Rane and other dignitaries while felicitating the Covide warriors at Chimbel (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड वॉरीअर्सचा सत्कार

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व आमदार टोनी फर्नांडिस यांची उपस्थिती (Goa)

विठ्ठल पारवाडकर

Panjim: आरोग्य क्षेत्रातील (Health sector) डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Doctors & Health Workers) अथक परिश्रम केल्यामुळेच राज्यात कोरोना महामारी (Corona epidemic) नियंत्रणात आली. त्यामुळे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा गौरव करणे आपले आद्य कर्तव्य ठरते. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwjit Rane) यांनी आज केले. तिसवाडी तालुक्यातील चिंबल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड वॉरीअर्सच्या सत्कार सोहळ्यात राणे बोलत होते (Covide Warriors felicitated Ceremony). यावेळी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस (MLA Tony Fernanades), आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा. रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड.अमित पालेकर, लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, आरोग्य अधिकारी डॉ. जुडे डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते. (Goa)

कोरोना काळात चांगली कामगीरी करतानाच लसीकरण मोहिमेतही चिंबल आरोग्य केद्रातील (Chimbel Health Center) डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान दिले, त्याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन करत आहे. जनसेवा हेच आपले कर्तव्य असून राज्यातील नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा पुरवून त्यांचे हित जपण्यास आम्ही कटीबध्द आहोत. असेही आरोग्यमंत्र्यानी पुढे बोलताना सांगितले. मंत्री राणे व आमदार फर्नांडिस यांच्याहस्ते चिंबल आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT