Corona|Covid-19| JN.1 Dainik Gomantak
गोवा

COVID-19 variant JN.1: गोव्यात कोरोना फैलावतोय; 24 तासांत 9 कोविड प्रकरणे

COVID-19 variant JN.1: कोरोनाची सक्रिय प्रकरणे 60 पार

Ganeshprasad Gogate

COVID-19 variant JN.1: गोव्यात गेल्या 24 तासांत 9 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती समोर आलीय. तर गेल्या 24 तासांत 10 जण कोरोना मुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. आजपर्यंत सक्रिय प्रकरणांची संख्या 60 च्या वर गेली असली तरी सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.

नवीन आढळलेल्या 9 कोरोना रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या एकूण 251नवीन चाचण्या झाल्या होत्या. त्यातून नवीन 9 रूग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 60 वर पोहचली आहे.

सध्या गोव्यात सनबर्न आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने देश-विदेशी पर्यटक येत आहेत. त्यातच आता कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळू लागले आहेत.

त्यात गोवा हे देशातील एक हॉटस्पॉट ठरत आहे. काही वर्षांपूर्वी कोरोनाने भारतासह जगभरात थैमान घातले असल्याने साहजिकच या नव्या व्हेरियंटचे रूग्ण वेगाने सापडू लागल्याने सर्वत्र चिंता व्यतक केली जातेय.

मात्र असं असलं तरी प्रत्येक व्यक्तीने आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना केल्यास आपण आपली ताब्यात चांगली राखू शकतो.

यासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जाणे अपरिहार्य असल्यास मास्क वापरावा. बाहेरून जाऊन आल्यावर कटाक्षाने हात-पाय धुवावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT