Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Updates: गोव्यात कोरोनाची तिसरी लाट

आठ महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांचा सर्वाधिक आकडा, नवे 2,476 रुग्ण : पॉझिटिव्हिटी रेट 30.36 टक्के; चौघांचा मृत्यू, 27 जण इस्पितळात

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यभरात वाढत असलेले कोरोना (Covid-19) बाधितांचे प्रमाण लक्षात घेता आणि आरोग्य विभागाने तिसरी लाट आल्याचे मान्य केल्याने सामाजिक संसर्गाची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी नागरिकांनी एसओपीचे पालन करत सुरक्षित राहणे गरजेचे असल्याचे मतही आरोग्य प्रशासनाने व्यक्त केले आहे. कोरोनासंबंधीचे कडक निर्बंध कायम असतानाही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल राज्यात (Goa covid updates) सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 19 झाली आहे, तर पॉझिटिव्हिटी रेट 30.36 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नवे 2,476 रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील 11 लाख 27 हजार 653 नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असून त्याची टक्केवारी 96 टक्के इतकी आहे. अद्याप 48 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, गरोदर महिला, गरोदरपणासाठी इच्छुक, ज्यांना लस घ्यायचीच नाही, अशांचा समावेश आहे. तर 15 ते 18 वयोगटातील 68 टक्के मुलांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. तपासणीसाठी रांगा : कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

केवळ 3091 जणांनी घेतला बूस्टर डोस

राज्यातील आरोग्य कर्मचारी, कोविड वॉरियर, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील आजाराने त्रस्त (कोमॉर्बिड) नागरिक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. राज्यात असे सुमारे 28 हजार लोक आहेत. त्यापैकी केवळ 3091 लोकांनी हा डोस घेतला आहे.

8154 संशयित रुग्णांच्या चाचण्या

1 लाख 93 हजार 977 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 1 लाख 78 हजार 421 रुग्ण बरे झाले. सध्या 12 हजार 19 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 537 झाला आहे. गेल्या 24 तासांत 27 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी 8,154 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या.

राज्यात सापडलेले ओमिक्रॉनचे रुग्ण हे कोणत्याही प्रकारचे प्रवासी नव्हते. त्यामुळे त्यांना झालेली ओमिक्रॉनची बाधा हा सामाजिक संसर्गाचा भाग म्हणावा लागेल. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा सामाजिक संसर्ग झाल्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता एसओपीचे कडक पालन करावे आणि काळजी घ्यावी.

- डॉ. शेखर साळकर, सदस्य, कृती दल, गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT