Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: ट्रॉलरमालकांची सतावणूक सुरुच!

Goa Court: मालीम जेटीवर मांडवी मच्छीमार मार्केटिंग सहकारी सोसायटीकडून मज्जाव केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ट्रॉलरमालक गौरीश साळगावकर यांना आवश्यक सर्व साधनसुविधा देण्याचे निर्देश देऊनही मालीम-बेती जेटीच्या मांडवी मच्छीमार मार्केटिंग सहकारी सोसायटीकडून त्यांची सतावणूक सुरूच आहे. न्‍यायालयाच्‍या आदेशाचा हा अवमान आहे. त्‍यामुळेच न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

साळगावकर यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी आपण ट्रॉलर खरेदी करून मच्छीमार व्यवसाय सुरू केला. मात्र, आपणास मालीम जेटीवर मांडवी मच्छीमार मार्केटिंग सहकारी सोसायटीकडून मज्जाव केला जात आहे.

तसेच ट्रॉलरसाठी लागणारे डिझेल, कामगारांसाठी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा दिला जात नाही. याविरोधात आपण मच्छीमार खात्यास वेळोवेळी निवेदने दिली. तरीही सोसायटीकडून दिलासा व सवलत मिळाली नसल्‍याने शेवटी न्यायालयात धाव घेतली.

यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने 21 सप्टेंबर 2022 रोजी आदेश जारी करीत याचिकादारास मालीम जेटीवर बोट लावण्यासह तेथील सर्व सुविधा पुरवाव्‍यात असे मांडवी सहकारी सोसायटीला सांगितले.

परंतु अद्याप सोसायटीकडून या आदेशाची कार्यवाही झालेली नाही. तसेच मच्छीमार खात्यानेही सहकारी सोसायटीला याचिकादाराला या सवलती देण्याची सूचना केली होती. त्याकडेही सोसायटीने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्‍याचा आरोप साळगावकर यांनी केला.

लाखो रुपयांची मासळी कुजविली

दुसरी गोष्‍ट म्‍हणजे याचिकादार साळगावकर यांना हक्काच्या लढाईत सहकार्य करणारे दुसरे ट्रॉलरमालक अविनाश शिंदे यांच्यावरही मालीम जेटीच्या (Jetty) मांडवी मच्छीमार मार्केटिंग सहकारी सोसायटीने आपला रोष दाखविला आहे. त्यांची मासळी सध्या उचलली जात नाही. त्यांची दीड टनापेक्षा अधिक मासळी बोटीत कुजल्याने त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच इतर सुविधांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे, असा आरोप साळगावकर यांनी केला.

गौरीश साळगावकर व अविनाश शिंदे, ट्रॉलरमालक-

सहकारी सोसायटीच्‍या चेअरमनकडून न्‍यायालयाच्‍या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. सदर जेटी आपल्याच मालकीची असल्याच्या आविर्भावात ते वागत आहेत. या जेटीवर अनेक गैरप्रकारही सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT