Panjim Crime Case | Court  Dainik Gomantak
गोवा

Panjim: पणजी बलात्कारप्रकरणातील आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Panjim: न्यायालयाच्‍या निवाड्यात पोलिस तपासकामातील त्रुटींबाबत निरीक्षण नोंदविले आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim: एका तरुणीवरील बलात्कार प्रकरणाच्या आरोपात अपुऱ्या पुराव्यांअभावी पणजी जलदगती न्यायालयाने सुमेर ऊर्फ समीर सिंग राठोड याची निर्दोष मुक्तता केली. पीडित तरुणी ही अल्पवयीन असल्याचे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. तसेच तपासकामातही त्रुटी ठेवण्यात आल्याचे निरीक्षण या निवाड्यात नोंदविण्‍यात आले आहे.

पर्वरी पोलिसांनी तपासकामावेळी पीडित तरुणी तसेच संशयिताची डीएनए चाचणी केली होती. या चाचणीच्या तपासणीवेळी सकारात्मक अहवाल आला असला तरी या बलात्कारप्रकरणी तिच्या आईवडिलांची जबानी नोंदविण्यात आली नाही.

ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याचा जन्मदाखला पोलिसांसमोर सादर करण्यात आला नाही, तर ती शाळेत शिकत असल्याचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पोलिसांनी मिळविला होता. त्यातून तिचे वयोमान सिद्ध होऊ शकत नाही. संशयिताशी तिचे अनैतिक संबंध होते असे तक्रारीत नमूद करण्यात आले तरी त्याची तक्रार दिली गेली नव्हती.

पोलिसांनी या प्रकरणात सादर केलेल्या साक्षीदारांपैकी एकाविरोधात पोलिसात गुन्हे दाखल होते. त्यातून तो निर्दोष सुटलेला आहे. या खटल्यात ज्या साक्षीदारांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या त्यातून संशयित या प्रकरणात गुंतलेला आहे का, याबाबत स्‍पष्‍टता होत नाही, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

काय आहे प्रकरण?

30 एप्रिल 2019 रोजी एक अविवाहित तरुणी म्हापसा इस्पितळात तपासणीसाठी गेली असता ती गरोदर असल्याचे डॉक्टरांना तपासणीवेळी आढळून आले. त्यांनी पर्वरी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. संशयित सुमेर सिंग राठोड याला पोलिसांनी अटक केली. वैद्यकीय तपासणीत ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

पोलिसांनी संशयिताविरोधात बलात्कार, बालकायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला. तरुणी अल्पवयीन असल्याचे सिद्ध न झाल्याने आरोपपत्र सादर करण्यापूर्वी न्यायालयाच्या परवानगीने बालकायदा रद्द करण्यात आला. तसेच संशयिताला काही दिवासांनी जामीनही मिळाला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

या खटल्यावरील सुनावणीवेळी संशयित राहत असलेल्या घराचा मालक, तो काम करता असलेला मालक, डॉक्टर, साक्षीदार, वैद्यकीय रक्ततपासणीतज्ज्ञ यांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या होत्या. मात्र या जबान्यांतून संशयिताविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्याइतपत पुरावे सादर करण्यास पोलिस अपयशी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT