Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

सत्तरीच्या बंटी - बबलीचा आणखी एक पराक्रम, दोडामार्गमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली एकाला 15 लाखांचा गंडा

Goa Fraud: संशयित फ्लॅट तसेच दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच संकल्प यांनी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली.

Pramod Yadav

वास्को: फ्लॅट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या सत्तरी येथील दाम्पत्याचा आणखी एक पराक्रम उघडकीस आला आहे. दोडामार्ग - महाराष्ट्र येथे फ्लॅट मिळवून देतो असे आमिष देत 15 लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वास्को पोलिसांनी याप्रकरणी दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.

विधिशा आणि विजयनाथ असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी संकल्प लहू शेटगांवकर (चिखली) यांनी तक्रार दाखल केली आहे. नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विधिशा आणि विजयनाथ यांनी संकल्प यांना दोडामार्ग, महाराष्ट्र येथे एका गृहप्रकल्पात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

संकल्प यांनी संशयितांना १५ लाख रुपये दिले मात्र त्यांना फ्लॅट मिळाला नाही. संशयित फ्लॅट तसेच दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच संकल्प यांनी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

यापूर्वी देखील फसवणुकीचा प्रकार

संशयित विधीशा आणि विजयनाथ यांनी यापूर्वी देखील अशाप्रकारे एकाची फसवणूक केल्याचे प्रकरण नोंद आहे. फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT