Pandurang Markaikar Dainik Gomantak
गोवा

Corruption In Goa: 'एका फाईलसाठी मंत्र्याला दिली 20 लाखांची लाच, गोव्यात भ्रष्टाचार नव्हे लूट सुरुये'; माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Corruption In Goa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात आले असता मडकईकरांनी त्यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

Pramod Yadav

Goa government corruption

पणजी: गोव्यातील भाजप सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना आता भाजप नेत्यानेच सरकारवर गंभीर आरोप केला आहे. एक फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांला १५ ते २० लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांनी केला आहे. राज्यातील मंत्री केवळ पैसे घेण्यात व्यस्त असल्याचे मडकईकर म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात आले असता मडकईकरांनी त्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. मडकईकर २०२७ च्या निवडणुकीसाठी इच्छुक असून, तिकीटाच्या मागणीसाठी मडकईकरांनी संतोष यांची भेट घेतली. भेट घेऊन बाहेर आल्यानंतर पांडुरंग मडकईकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मडकईकरांनी यावेळी भाजप सरकारवर सडकून टीका करत मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. तसेच, भाजपने यावेळी तिकीट नाकारल्यास इतर पक्ष देखील त्यांच्या संपर्कात असल्याचे मडकईकर म्हणाले.

"माझी तब्येत ठिक नसल्याचे कारण देत २०२२ साली मला तिकिट नाकारण्यात आले. लवकर बरे व्हा तुम्हाला योग्य पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. भाजप पुन्हा सत्तेत आले आणि मला विसरले. त्यासाठी आज मी मला पद मिळेल का असा प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो", असे पांडुरंग मडकईकर म्हणाले.

"भाजपकडून मला याबाबत कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यापर्यंत मी वाट पाहणार असून, त्यानंतर निर्णय घेईन. मी २०२७ च्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. भाजपने तिकिट नाकारल्यास, मी या पक्षा रहायचे की नाही? याबाबत निर्णय घेईन. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड यासारखे पक्ष माझ्या संपर्कात आहेत. मी योग्य निर्णय घेईन", असे मडकईकर म्हणाले.

"या सरकारमध्ये काहीच योग्य सुरु नाहीये. सर्व मंत्री पैसे मोजण्यात व्यग्र आहेत. एक फाईल क्लिअर करण्यासाठी मी एका मंत्र्याला १५ ते २० लाख दिले. राज्यात भ्रष्टाचार नव्हे तर लूट सुरुये, असा खळबळजनक आरोप मडकईकरांनी केला. राज्यातील लोक या सरकारला खाली खेचण्याची वाट पाहत आहे", असेही मडकईकर म्हणाले.

दरम्यान, आगामी २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपने आत्ताच कंबर कसली असून, आढावा घेण्यासाठी बी. एल. संतोष दुसऱ्यांदा गोव्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संतोष यांची भेट घेतली. मडकईकरांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री सावंत यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. २०२२ साली भाजपने तिकिट नाकारल्याने नाराज असलेल्या मडकईकरांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अर्धसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT