पणजी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 861 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, मात्र, त्यात कोरोनाचे बाधित सापडले नाहीत. तब्बल चार महिन्यांनंतर नवे बाधित नसलेला हा दिवस उजाडला.
याशिवाय गेल्या दहा दिवसांमध्ये कोरोनाचा एकही बळी गेलेला नाही. तसेच उपचारासाठी रुग्णालयातही कोणाला भरती केलेले नाही. यावरून राज्यातील कोरोनाची तिसरी लाट पूर्णतः नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी स्थिती असली तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय कोरोनासंबंधीचा ‘बूस्टर डोस’ घेण्यामध्ये अजूनही लोकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आता हा डोस 60 वर्षांवरील सर्वांसाठी खुला आहे. नागरिकांनी तो घ्यावा, अशी माहिती राज्य लसीकरण मोहीमप्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.
कोरोनातून चारजण बरे: आज (शुक्रवारी) कोरोना संक्रमणाचा दरही शून्य टक्के झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 34 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत नवे बाधित सापडले नाहीत. शुक्रवारी 861 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी कोणालाही लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय आज चारजण कोरोनातून बरे झाले.
एकूण रुग्ण = 2 लाख 45 हजार 267
बरे झालेले = 2 लाख 41 हजार 403
सध्या महामारी पूर्णतः नियंत्रणात आहे. शिवाय नवे मृत्यू आणि ॲडमिशनही नाही. मात्र, विषाणूमध्ये म्युटेशन झाल्यास कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. परंतु ती यापूर्वीच्या लाटेपेक्षा कमी क्षमतेची असेल. राज्यात लसीकरणाचे प्रमाण चांगले असून नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्यास त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. याशिवाय 12 ते 18 वयोगटातील मुलांनीही लस घ्यावी.
- डॉ. शेखर साळकर, सदस्य, कोरोना कृती दल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.