Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : जाणून घ्या गोव्यातील आजची कोरोनाची स्थिती; सरकारने दिला सतर्कतेचा इशारा

जगभर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ-7 या व्हेरियंटने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जगभर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य आरोग्यमंत्र्यांच्या घेतलेल्या बैठकीत विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची कडक तपासणी करण्याबरोबरच आवश्‍यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील सर्व विमानतळांवर कोविड सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली असून, परदेशी पर्यटकांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

आजची रुग्णसंख्या

  • नवे रुग्ण : 0

  • सक्रिय रुग्ण : 16

  • मृत्यू : 0

सतर्कतेचा आदेश

जगभर आणि देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे आदेश दिले असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे 27 डिसेंबर रोजी मॉक ड्रिल करण्याची सूचना केली आहे.

सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेची तपासणी करा, खाटांची उपलब्धता तपासा, डॉक्टर, नर्स, साहाय्यक वैद्यकीय कर्मचारी, आयुष डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर, आशा, अंगणवाडी वर्कर यांची उपलब्धता तपासा, साधनसुविधांची माहिती घेण्याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोर्टात केस जिंकल्यावर भटक्या कुत्र्यांची गोव्यात पिकनिक; सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ Watch

Ganesh Chaturthi Best Status: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास 10 स्टेटस, Watch, Download, Share

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

High Court: 'गाय केवळ पूजनीयच नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

SCROLL FOR NEXT