Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: हुश्श, गोवा कोरोनामुक्त राज्यात शून्य सक्रिय रूग्ण; 7 दिवसांत एकही नवा रूग्ण नाही

सध्या राज्यात एकही सक्रिय कोरोना रूग्ण नसल्याने गोव्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आली आहे. मागील सात दिवसांत राज्यात एकाही कोरोना बाधित रूग्णांची नव्याने नोंद झालेली नाही. आज 204 जणांचे नमूने तपासण्यात आले.

सध्या राज्यात एकही सक्रिय कोरोना रूग्ण नसल्याने गोव्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

राज्यात 28 ते 31 जुलै याकाळात एकही नव्या कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झाली नाही. यापूर्वी 27 जुलै रोजी दोन नव्या रूग्णांची नोंद झाली होती. त्याच्या चार दिवसानंतर एक ऑगस्ट रोजी एक नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यानंतर 09 ऑगस्ट रोजी नव्याने एक रूग्ण वाढला.

मागील सात दिवसांत मात्र राज्यात नव्याने एकही कोरोना बाधित रूग्ण वाढला नाही. तसेच, राज्यात सक्रिय असणाऱ्या एका कोरोना बाधित रूग्णाला देखील आज डिस्जार्च देण्यात आला. त्यामुळे गोवा सध्यातरी कोरोनामुक्त झाला आहे.

गोव्यातील कोरोनाची आजवरची आकडेवारी

गोव्यात आजवर 02 लाख 63 हजार 334 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 02 लाख 59 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजवर 4 हजार 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT