Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोव्यातील जनतेला मोठा दिलासा, सक्रिय कोरोना रूग्ण हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच

गेल्या 24 तासांत 10 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यातील कोरोना संसर्ग आता नावापुरता शिल्लक राहिला आहे. राज्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सक्रिय कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत.

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज (शुक्रवारी) दिवसभरात राज्यात केवळ एकच नवीन कोरोनाबाधित रूग्णाची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 10 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या कोरोना अहवालानुसार, आज दिवसभरात 339 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी एका रूग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर, दिवसभरात दहा कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात सध्याच्या घडीला केवळ 11 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, गोव्यात आजवर दोन लाख 63 हजार 287 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी दोन लाख 59 हजार 262 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात आजवर 4,014 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गोव्याचा रिकव्हरी रेट 98.47 टक्के एवढा आहे.

पावासाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असतात. अशात राज्यातील कमी झालेली सक्रिय रूग्णांची संख्या दिलासा देणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT