Cooch Behar Trophy 2023 Dainik Gomantak
गोवा

Cooch Behar Trophy: मुंबईची आक्रमक शैली! गोव्याच्या गोलंदाजांसाठी आजचा दिवस कठीण

Cooch Behar Trophy: मुंबईच्या पहिल्याच दिवशी 9 बाद 403 धावा

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy

कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या गोलंदाजांसाठी सामन्याच्या पहिला दिवस कठीण ठरला. अवेस खान याच्या खणखणीत 140 धावांच्या बळावर मुंबईने पहिला डाव शुक्रवारी 9 बाद 403 धावांवर घोषित केला.

चार दिवसीय सामना शुक्रवारी कांदिवली-मुंबई येथील सचिन तेंडुलकर जिमखान्यावर सुरू झाला. पहिल्या दिवसअखेर गोव्याला वीर यादव (23) व शंतनू नेवगी (14) यांनी 10 षटकांत 37 धावांची सलामी दिली. ते अजून 366 धावांनी पिछाडीवर आहेत.

गोव्याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस पाचारण केले, पण पाहुण्या संघाचा हा निर्णय अंगलट आला. अवेस खान व आयुष म्हात्रे यांनी मुंबईला आक्रमक शैलीत ९८ धावांची सलामी दिली.

गोव्याच्या स्वप्नील गावकर याने अर्धशतक केलेला आयुष व आदित्य रावत यांना लवकर बाद करण्यात यश मिळविले, पण नंतर अवेस याने कर्णधार मनन भट याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करून मुंबईला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले.

नंतर नूतन व प्रतीक यादव यांची अवेस याला चांगली साथ मिळाल्यामुळे मुंबईने त्रिशतकी धावसंख्या आरामात ओलांडली. तळात आयुष वर्तक व उमर खान यांनीही उपयुक्त धावा केल्यामुळे मुंबईला दिवसातील सोळा षटके बाकी असतानाच चारशे धावा गाठणे सोपे ठरले.

162 चेंडूंत140 धावा!

गोव्याच्या कर्णधार पुंडलिक नाईक याने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केल्यामुळे अवेस खान याला दीडशतक हुकले. त्याने शैलीदार आक्रमक फलंदाजी करताना 162 चेंडूंत 25 चौकारांच्या मदतीने 140 धावा नोंदविल्या. गोव्यातर्फे स्वप्नील गावकर याने तीन, तर शंतनू नेवगी याने दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई, पहिला डाव ः ७४ षटकांत ९ बाद ४०३ घोषित (आयुष म्हात्रे ५०, अवेस खान १४०, मनन भट ४९, नूतन ३३, प्रतीक यादव ३७, आयुष वर्तक ४७, उमर खान ३०, युवराज सिंग १४-१-९३-१, कौस्तुभ पिंगुळकर १०-१-५१-०, स्वप्नील गावकर १४-१-७९-३, पुंडलिक नाईक १२-०-५८-१, यश कसवणकर १२-०-५४-१, शंतनू नेवगी ५-२-१४-२, रुद्रेश शर्मा ७-०-४९-०).

गोवा, पहिला डाव ः १० षटकांत बिनबाद ३७ (वीर यादव नाबाद २३, शंतनू नेवगी नाबाद १४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

Solar Village Goa: सौर पॅनल बसवा 1 कोटी मिळवा! 'पीएम सूर्यघर' योजनेतून गोव्याला खास भेट; प्रत्येक जिल्ह्यात 'आदर्श सौर गाव' निर्माण करण्याचा निर्णय

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

Kala Academy Award Controversy: कला अकादमी सॉफ्ट टार्गेट! युगांक नायक यांच्या आक्षेपामुळे पुरस्कारावरुन वादंग; नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये बदलाची गरज

SCROLL FOR NEXT