Bicholim market Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोली बाजारात चतुर्थीनंतरही ग्राहकांची गर्दी रोडावली

मागील चार-पाच दिवसांपासून मात्र मासळी मार्केटमध्ये (Fish Market) मत्स्यखवय्यांचा गजबजाट जाणवत आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: ग्राहकांची गर्दी रोडावल्याने डिचोली बाजारात सध्या सामसूम पसरत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या गोष्टीचा अनुभव बाजारातील व्यापारी आणि विक्रेत्यांना येत आहे. चतुर्थीनंतर नियमित आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. दुसऱ्याबाजूने ग्राहकांची बाजारातील वर्दळ कमी झाली असली, तरी मागील चार-पाच दिवसांपासून मात्र मासळी मार्केटमध्ये (Fish Market) मत्स्यखवय्यांचा गजबजाट जाणवत आहे.

'चवथी'चा बाजारही थंडावला

चतुर्थी काळात साधारण आठवडाभर चतुर्थीचा बाजार भरला होता. चतुर्थीच्या बाजारावेळी दोन-तीन दिवसांचा अपवाद सोडल्यास पावसाचाच कहर होता. पावसाने उसंत घेतली, की बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. पावसावेळी मात्र बाजार थंडावत होता. त्यामुळे यंदा चतुर्थीच्या बाजारावरही बराच परिणाम झाला होता. त्यातच महागाईमुळेही बाजारातील खरेदीवर परिणाम झाल्याचा अंदाज आहे. यंदा चतुर्थी बाजारातील आर्थिक उलाढालीतही यंदा मोठा परिणाम दिसून आला आहे. यंदा चतुर्थी बाजारातील आर्थिक उलाढालीवर जवळपास 40 ते 50 टक्के घट झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. चतुर्थीच्या बाजारानंतर आता नियमित बाजारावरही परिणाम दिसून येत आहे. दुपारनंतर तर बाजारात सामसूम दिसून येत आहे. बहूतेक व्यापारी, विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.

यंदा चतुर्थीच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाच्या कहरामुळे हा परिणाम झाल्याचा अंदाज असला, तरी वाढती महागाई हे सुद्धा एक प्रमुख कारण असू शकते. चतुर्थीनंतर अजूनही बाजारावर परिणाम दिसून येत आहे. ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. असे बाजारातील काही दुकानदारांनी सांगितले.

मोदकांना मागणी कमी

चतुर्थी म्हटली, की तयार मोदकांना प्रचंड मागणी असायची. यंदा मात्र तयार मोदकांना मागणी कमी होती. अनेकांनी मोदकांसाठी लागणारे साहित्य घरी नेवून युट्युबच्या मदतीने घरीच मोदक करणे पसंद केले. काहींनी तर ऑनलाईन विक्रीही केली.

-सौ. मेघना येंडे, मिठाई विक्रेती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT