Goa Pradesh Women's Congress Dainik Gomantak
गोवा

Goa: पेट्रोल, गॅसच्या दरवाढीविरुध्द कॉंग्रेसचा पणजीत महा मोर्चा

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व युवा शाखेचे अध्यक्ष एडवोकेट वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: गॅस सिलेंडर त्याचबरोबर पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात आज गोवा प्रदेश महिला काँग्रेस (Goa Pradesh Women's Congress) आणि गोवा प्रदेश युवा काँग्रेस यांच्यातर्फे संयुक्तपणे एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस कार्यालय ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघाला. काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्ष बिना नाईक, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व युवा शाखेचे अध्यक्ष एडवोकेट वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

ढोल व ताशाच्या सहाय्याने हा मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत , इंधनाचे दर कमी करा, गॅसची दरवाढ कमी करा . अशी जोरदार मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी बोलताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले की केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त वेळा पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली आहे. त्यामुळे अच्छे दिन कहा गये ? असे म्हणायची पाळी सर्वसामान्य भारतीयावर आलेली आहे.

वाढलेली दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केली. तर बिना नाईक यांनी गॅस, पेट्रोल व इतर पदार्थांच्या दरवाढीमुळे महिलांना फारच त्रास होत असून कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतानाही झालेली दरवाढ निषेधार्थ असल्याचे नाईक म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT