Goa Congress Women Protest Dainik Gomantak
गोवा

LPG Cylinder Price Hike: लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन सिलींडर दरवाढीचा निषेध, महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन Video

Goa Congress Women Protest: केंद्रातील भाजप सरकारने घरगुती-व्यावसायिक गॅसचे दरवाढ केले आहेत. त्याविरोधात रविवारी प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

LPG cylinder price hike protest : केंद्रातील भाजप सरकारने घरगुती-व्यावसायिक गॅसचे दरवाढ केले आहेत. त्याविरोधात रविवारी प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. काँग्रेस भवनाबाहेर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन सिलींडर दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध नोंदविला.

उसगावकर म्हणाल्या, आज सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत आहे. मात्र, या दिवसाचे बक्षीस म्हणून सरकारने महिलांना ६० रुपयांना गॅस दरवाढ करून दिले आहे आणि ही बाब निषेधार्ह आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे.

महागाईच्या झळा अगोदरच देशातील जनता सोसत आहे. अगोदरच सर्व वस्तूंच्या दर वाढलेल्या आहेत, त्यातच केलेल्या या गॅस सिलिंडर दरवाढीत जनता भरडली गेली आहे. याप्रसंगी उसगावकर म्हणाल्या, राज्यातील भाजप सरकार इव्हेंट करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.

परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सिलिंडरसाठी अनुदान योजना सुरू करू शकत नाही. त्यांना कार्यक्रमांवर खर्च करण्यात अधिक धन्यता वाटते. मोफत सिलिंडरचे आमिष दाखवून सरकारने सत्ता मिळविली पण लोकांना मोफत सिलिंडरचे वाटपही केले गेले नाही, राज्यातील जनतेची केवळ फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT