Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'भाजप सरकारचे कारनामे लोकांसमोर मांडणार...', काँग्रेसची आता 'हात से हात जोडो' मोहीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

सुशांत कुंकळयेकर

पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंतच्या 'भारत जोडो' यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने आता देशभर 'हात से हात जोडो' मोहीम सुरू केली आहे. राज्यात 04 मार्चपासून पुढील महिनाभर ही मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, सरचिटणीस विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो रॉड्रिग्ज यावेळी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केला आहे. 2014 पासून जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. राज्यात बेरोजगारी, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पण सरकार सुस्त आहे. जनतेवर अनेक संकटे येत असतानाही सरकारला काहीही पडून गेलेले नाही. याउलट राज्यात काँग्रेसचे सरकार असताना जनतेला हवे तेच निर्णय घेण्यात आले. गोमंतकीय जनतेचा विकास साधण्यासाठीच काँग्रेस सरकार कार्यरत राहिले. आज गोव्यातील जनता म्हादई नदीबाबत चिंतेत आहे. पण गोव्यातील भाजप सरकार म्हादईचा राजकारणासाठी वापर करीत आहे. लोकांना कोळसा नको असतानाही सरकार जबरदस्तीने रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करीत आहे, असे पाटकर म्हणाले.

'हात से हात जोडो' मोहिमेद्वारे काँग्रेस आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चाळीसही मतदारसंघांत जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांच्या समस्या जाणून घेतील. भाजप सरकारचे कारनामे त्यांच्यासमोर सादर करतील, असेही पाटकर यांनी सांगितले.

असे आहे मोहिमेचे वेळापत्रक :

विजय भिके यांनी उत्तर गोव्यातील मोहिमेची माहिती दिली. उत्तर गोव्यात 12 दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. 4 मार्चला मांद्रे येथील तेरेखोलमधून मोहीमेस प्रारंभ होईल. 5 मार्चला शिवोली, कळंगुट, 11 मार्चला म्हापसा, हळदोणा, 12 रोजी साळगाव, पर्वरी, 13 रोजी पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, 14 रोजी सांतआंद्रे, कुंभारजुवे, 15 रोजी थिवी, डिचोली, 16 रोजी पेडणे, 17 रोजी मये, 18 रोजी साखळी आणि 19 मार्चला पर्ये आणि वाळपई येथे मोहीम राबण्यात येईल. साखळीत जाहीर सभा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सावियो रॉड्रिग्ज यांनी दक्षिण गोव्यातील मोहिमेची माहिती दिली. दक्षिण गोव्यात 23 मार्चपासून मोहीम सुरू होईल. 23 रोजी प्रियोळ, मडकई, 24 रोजी फोंडा, 25 रोजी शिरोडा, सावर्डे, 26 रोजी कुडचडे, केपे, 27 रोजी सांगे, 28 रोजी काणकोण, 29 रोजी नावेली, बाणावली, 31 रोजी कुठ्ठाळी, मुरगाव, 01 एप्रिल रोजी वास्को, दाबोळी, 02 एप्रिलला कुंकळ्ळी, वेळ्ळी, 03 रोजी नुवे, कुडतरी व फातोर्डा आणि 05 रोजी मडगावात मोहिमेचा समारोप होईल. तेथे जाहीर सभाही घेण्यात येईल, असेही रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT