लुईझींन फालेरो (Luizinn Falero) यांना टक्कर देण्यासाठी गोवा काँग्रेसमध्ये (Goa Congress) नेत्यांची भरती चालू करत काँग्रेसने नवी चाल खेळली आहे. फालेरो यांच्या नावेली मतदारसंघाचे माजी आमदार आवार्तीनो फूर्तादो (Avartino Furtado) यांनी आज गोवा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आयाराम गयाराम ला सुरुवात झाली आहे. काल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री लुईझीन फालेरो काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने नवी चाल खेळत यांना टक्कर देण्यासाठी फालेरो यांच्या नावेली मतदारसंघाचे माजी आमदार आवेर्तीनो फूर्तादो यांना पक्षात घेतले आहे. पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत केले. 2012 च्या निवडणुकीत आवेर्तीनो फूर्तादो यांनी नावेली मतदारसंघात हेविवेट नेते चर्चिल अलेमाव यांच्या पराभव केला होता. ते मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री होते .ते उत्तम फुटबॉलपटू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.