Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: ‘म्हादई’प्रकरणी गोवा काँग्रेसची भूमिका कायम

अमित पाटकर ः शेवटपर्यंत विरोधाचा निर्धार

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Patkar कर्नाटकात म्हादई वळविण्यास गोवा प्रदेश काँग्रेसने दर्शविलेला विरोध हा कायम राहणार आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आला तरी त्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी सांगितले.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्याने म्हादईविषयी काँग्रेसची भूमिका काय राहणार? याविषयी पत्रकारांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नावर पाटकर यांनी उत्तर दिले आहे.

परंतु कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हादईच्या कामासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर पाटकर म्हणाले, त्या-त्यावेळी आम्ही भूमिका मांडू.

दक्षिण गोवा खासदार आणि विरोधी पक्षनेते हे त्याविषयी गोवा काँग्रेसच्यावतीने बाजू मांडतील. परंतु गोवा काँग्रेसने म्हादई पाणी वळविण्यास जो विरोध दर्शविला आहे, तो कायम आहे.

भाजपने अगोदरच म्हादई कर्नाटकला विकली आहे, हे सांगत पाटकर यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT