Savio Coutinho, Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मेळाव्याला गर्दी हा केवळ दिखाऊपणा! मडगावात कमळ फुलेल अशा भ्रमात मुख्यमंत्र्यांनी राहू नये; कुतिन्होंचे टीकास्त्र

Goa Congress: मडगावात केवळ कागदावर विकास झालेला दिसत आहे. प्रत्यक्षात ‘अच्छे दिना’पेक्षा लोकांना ‘बुरे दिन’ जास्त पाहायला मिळतात, असेही कुतिन्हो यांचे म्हणणे आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मडगावात कमळ फुलेल या भ्रमात मुख्यमंत्र्यांनी राहू नये, असे काँग्रेस नेते व शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुचित केले आहे.

मडगाव भाजप मंडळाने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील गर्दी पाहुन कदाचित मुख्यमंत्र्यांना असे विधान करण्याचा मोह झाला असावा, पण या मेळाव्याला कुठून व कसे लोक आणले हे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा स्वतः माहिती करून घेतली असावी, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारांसमवेत लोकांची गर्दी होती, त्यांच्या बैठकांना लोकांची उपस्थिती असायची, मतदान केंद्रावरसुद्धा त्यांचेच कार्यकर्ते दिसत होते, पण शेवटी विजय काँग्रेस उमेदवाराचाच झाला याची आठवण कुतिन्हो यांनी यावेळी करून दिली.

मडगावात ‘अच्छे दिन’ येतील हे मुख्यमंत्र्यांचे विधान लोकांची दिशाभूल करणारे आहे. मडगावात केवळ कागदावर विकास झालेला दिसत आहे. प्रत्यक्षात ‘अच्छे दिना’पेक्षा लोकांना ‘बुरे दिन’ जास्त पाहायला मिळतात, असेही कुतिन्हो यांचे म्हणणे आहे.

सोनसोडोचा प्रश्न सुटला या मुख्यमंत्र्यांच्या विधानालासुद्धा सावियो कुतिन्हो यांनी आक्षेप घेतला आहे. सोनसोडो कचरा प्रकल्पात किंवा सिवेज व्यवस्थापनामध्ये जी सुधारणा झाली आहे ती केवळ उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे. यात आमदार किंवा मडगाव नगरपालिकेची कोणतीही भूमिका नाही, असेही कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

‘याला ‘अच्छे दिन’ कसे म्हणावे’

मुख्यमंत्र्यांनी मडगावातील ‘अच्छे दिना’बद्दल जे विधान केले आहे याचा अर्थ त्यांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. मुख्यमंत्र्यांनी सोनसोडो प्रकल्पाला भेट देऊन तेथील पाहणी करावी व नंतरच आपला अभिप्राय जाहीर करावा. नगरपालिकेने विविध शुल्कांत वाढ केल्यामुळे मडगावकर नाराज झाले आहेत. याला ‘अच्छे दिन’ कसे म्हणावे, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT