Amit Patkar on PWD minister Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: मंत्री काब्राल यांना मतदारसंघाची काळजी घेता येईना; पहिल्याच पावसात कुडचडेची दैना!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची टीका; सोशल मीडियात फोटो शेअर करून साधला निशाणा

Akshay Nirmale

Amit Patkar on PWD minister Nilesh Cabral: गोव्यात बुधवारी आणि गुरूवारी काही भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. पैकी कुडचडे येथे पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले होते, तर रस्तेही उखडले गेले होते.

त्याची छायाचित्रे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोशल मीडियातून शेअर करत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्यावर निशाणा साधला.

अमित पाटकर यांनी ट्विटरवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये दिसते की, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्यासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी रस्ते उखडले आहेत. गटारींची दुरवस्था झाली आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच दिवशी कुडचडेमध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे, असे पाटकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघाची काळजी घेता येत नाही.

पहिल्या पावसात झालेल्या दुरवस्थेतून त्यांची क्षमता कळते. या पावसामुळे हे देखील दिसले आहे की, यंदाच्या पावसात गोवा पावसाच्या पाण्यात बुडणार आहे. हा सर्व 'मिशन टोटल कमिशन'चा परिणाम आहे, अशी टीकाही पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT