Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यात काँग्रेसकडून अदानींच्या पुतळ्याचे दहन; एलआयसी, एसबीआय समोर निदर्शने

काँग्रेसचे गोवा प्रभारी मणिकम टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress: प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज सकाळी पाटो पणजी येथील एलआयसी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गौतम अदानींच्या पुतळ्याचे दहन तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे गोवा प्रभारी मणिकम टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. मडगाव येथील एसबीआयच्या बाहेर निदर्शने करण्यात आली.

न्यूयॉर्कच्या हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी समूहावर केलेल्या आरोपामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. त्याशिवाय या कंपनीला मोठ्या प्रमाणात एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज दिले आहे.

या कर्ज व्यवहारामुळे सामान्यांच्या विमा खातेदारांची मोठी रक्कम वापरली गेली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीही निर्माण झाली आहे. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संबंध असल्याने भाजप सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

अदानी यांना सरकार पाठीशी घालत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एलआयसीने कर्ज दिल्यानंतर आपली बाजू सविस्तरपणे जनतेसमोर मांडलेली नाही. त्यामुळे काँग्रेस देशभर एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांसमोर निदर्शने करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT