Manikrao Thakre Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Congrees: "विकासाला विरोध नाही; मात्र 200 वर्ष जुन्या आस्थेचा विचार करा!" खापरेश्वर मंदिर वादावरून ठाकरे-पाटकर आक्रमक

Amit Patkar Goa: राखणदाराचं मंदिर हटवल्याने भाविकांकडून विरोध यावर मत नोंदवताना काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला

Akshata Chhatre

Khapreshwar Temple Porvorim Controversy

पर्वरी: गोव्यात सध्या खापरेश्वर मंदिराचा वाद शिगेला पोहोचाल आहे. २०० वर्ष जुनं वडाचं झाड आणि सोबतच असलेलं राखणदाराचं मंदिर हटवल्याने भाविकांकडून याचा विरोध केला जातोय.यावर मत नोंदवताना आता काँग्रेस पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आमचा विरोध विकासाला नाही, मात्र स्थानिकांच्या आस्थेचा सुद्धा तेवढाच विचार केला गेलं पाहिजे" असं माणिकराव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे देखील उपस्थित होते.

मंदिर पाडणं ही राजकीय खेळी!

पर्वरीत सुरु असलेलं बांधकाम आणि श्री देव खापरेश्वर याचं स्थलांतर हा मुद्दा गोव्यात बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. प्रसाद घेऊन मंदिरासाठी नवीन जागा शोधली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन देखील हा वाद शमण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गोवा सरकारवर निशाणा साधलाय.

२०० वर्षांपासून उभ्या असलेल्या मंदिराशी अनेकांची आस्था जोडलेली आहे, विकासाला विरोध नाही मात्र त्यांच्या आस्थेचा विचार गेला गेला पाहिजे असं माणिकराव म्हणालेत. धर्म कुठलाही असला तरीही स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं महत्वाचं असतं आणि पर्वरीत नोटीस न देता पडलेलं मंदिर ही घटना दुर्दवी असल्याचं ते म्हणतायत.

जनतेच्या इच्छा पायदळी तुडण्याचं भारतीय जनता पक्षाचं तंत्र अजिबात बरोबर नाही असं विधान त्यांनी केलंय. विकासाच्या नावाखाली मंदिर हटवलं असेल तर जागा पाहता मंदिर हटवण्याची गरज वाटत नाही असं म्हणत त्यांनी या घटनेला राजकीय खेळीचं नाव दिलंय.

प्रमोद सावंताक आमी पोर्तुगालक दवरुंया?

यावेळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील मंदिराच्या स्थलांतरावर मत मांडलं. घण घेऊन, एक्सकॅव्हेटर घेऊन मंदिर पडणं ते देखील स्थानिकांना विश्वासात न घेता ही एक दुर्दैवी घटना आहे. देशभरात जिथे भाजप मंदीर शोधण्याच्या मागावर आहे तिथेच दुसरीकडे हाच पक्ष गोव्यात राखणदाराचं मंदिर हातावतोय हे कितपत योग्य? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

राजकीय उद्देश ठेऊन काही लोकांकारावरी मंदिरच्या स्थानांतरासाठी परवानगी मिळवणं हे जर बरोबर असेल तर उद्या आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा पोर्तुगाल मध्ये नेऊन ठेवायचं का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्रीनीं देऊळ न हटवता त्याच ठिकाणी मंदिर उभारावं आणि हीच आमची इच्छा असल्याचं पाटकर यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT