Rahul Gandhi And Mallikarjun Kharge Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार? दिल्लीत खलबते

Goa Congress Loksabha Candidate: लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची १२ एप्रिल ही तारीख जवळ आली तरी उमेदवार जाहीर करू न शकलेल्या काँग्रेसची दिल्लीत खलबते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Loksabha Candidate

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची १२ एप्रिल ही तारीख जवळ आली तरी उमेदवार जाहीर करू न शकलेल्या काँग्रेसने आता उमेदवार निवडीसाठी दिल्लीत अंतिम खलबते सुरू केली आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अ‍ॅड. अमित पाटकर यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात सध्या बैठक सुरू झाली असून त्यात या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून सुरवातीला १४ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी एल्विस गोम्स यांनी थेट दिल्लीला आपला अर्ज पाठवला होता.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे खासदार असल्याने उत्तर गोवा मतदारसंघ जिंकण्यासोबत दक्षिण गोवा मतदारसंघ राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

उत्तर गोव्यात आधी मुळगाव आणि नंतर पेडणे येथे काही मतदारांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता उत्तर गोव्यातही पक्ष मुसंडी मारू शकतो, असे काँग्रेसच्या नेत्यांना आता वाटू लागले आहे. त्यामुळे काँग्रेसने उत्तर गोव्याच्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे.

खर्गेंच्या संमतीची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवारी) सायंकाळी उशिरापर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष मलिल्कार्जुन खर्गे यांच्याकडे दोन्ही जागांवरील काँग्रेस उमेदवारांची निश्चित झालेली नावे पोचणार असून त्यांच्याकडून आज रात्री किंवा उद्या त्या नावांची अधिकृत उमेदवार यादीतून घोषणा केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT