Girish Chodankar Meet Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar : काँग्रेस नेते गिरीष चोडणकरांची सभापतींवर टिका; संजय राउतांची घेतली भेट

दोन्ही राज्यातील विधानसभा सभापतींवर साधला निषाणा

Rajat Sawant

Girish Chodankar Meet Sanjay Raut : गोव्यातील काँग्रेस नेते गिरीष चोडणकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांची मुंबई येथे सामनाच्या कार्यालयात भेट घेतली. याबाबतची माहिती चोडणकर यांनी ट्विट करीत दिली. यावेळी दोघांमध्ये गोवा व महाराष्ट्र राज्यातील पक्षांतर केलेल्या आमदारांंबाबत सभापतींच्या भूमिकेवरुन चर्चा झाली.

आज काँग्रेस नेते गिरीष चोडणकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांची मुंबई येथे सामनाच्या कार्यालयात भेट घेतली. याभेटी दरम्यानचे फोटो चोडणकर यांनी शेअर केले आहेत. चोडणकरांनी ट्विट मध्ये म्हटले की, गोवा आणि महाराष्ट्र आपापल्या राज्यात पक्षांतर करणाऱ्या गद्दारांविरोधात लढत आहे. तसेच प्रदीर्घ प्रलंबित आमदार अपात्रता याचिका जलद गतीने निकाली काढण्यासाठी सभापतींना न्यायालयांकडून निर्देश मिळत आहेत.

संजय राऊत यांच्याशी सामना कार्यालयात आमदार अपात्रता याचिकेसंबंधी न्यायालयाच्या आदेशांबाबत चर्चा झाली. वेळेवर न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT