Election  Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat Election: आघाडी करण्यास कॉंग्रेस तयार! 'जिल्हा पंचायत'बाबत ठाकरेंचे विधान

Manikrao Thakare: विधानसभा निवडणुकीतील आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवर केला जाणार आहे अशी माहिती कॉंग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

पणजी: लोकसभा निवडणुकीतील आघाडीनंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत अन्य पक्षांशी आघाडी करण्यास कॉंग्रेस तयार आहे, मात्र ती आघाडी कशी असेल याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल.

केवळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतील आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवर केला जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर बोलताना दिली. कॉंग्रेस येत्या २ ऑक्टोबरपासून सदस्यत्व मोहीम गोव्यात सुरू करेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याच्या सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, भ्रष्ट्र सरकारने राज्यातील सर्व रस्ते खड्डेमय करून ठेवले आहेत. यामुळे चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या आणि विशेषतः मूर्ती नेणाऱ्या गोमंतकीयांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. भाजप सरकारच्या कृपेने हे खड्डेमय रस्ते वाट्याला आले याची जाण प्रत्येकाने ठेवावी. कॉंग्रेसने राजकीय व्यवहार समितीची बैठक आज घेतली, राजकीय चर्चा केली.

कार्यकर्ता आयुक्त!

माहिती हक्क कायद्याच्या कलम ६ नुसार राजकीय कार्यकर्त्याला आयुक्त नेमता येत नाही, येथे मात्र निवड झालेल्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्ता म्हणून अभिनंदन करतात, हा विषय आम्ही सोडणार नाही. फर्नांडिस यांनी जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम सुरुच ठेवणार असल्याचे आश्वासन दिले. डॉ. निंबाळकर यांनी कॉंग्रेसचे सरकार राज्यात आणण्यासाठीच आल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT