Goa Politics 
गोवा

Goa Politics: प्रत्येकाला व्हायचंय उमेदवार, काँग्रेस दिशाहीन; आल्मेदांचा पक्षप्रवेश आणि तानावडेचा प्रहार

Goa Politics: वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.

Pramod Yadav

Goa Politics

वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा आणि आमदारा कृष्णा दाजी साळकर यांच्या उपस्थितीत आल्मेदा यांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी सदानंद तानावडे यांनी राज्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच, काँग्रेस दिशाहीन असल्याचा आरोप तानावडे यांनी केला.

वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2022ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. दरम्यान, आल्मेदा यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. पणजीतील एका कार्यक्रमात आल्मेदांनी समर्थक नगरसेवकांसमवेत भाजपात पक्ष प्रवेश केला.

भाजपने राज्याचा ज्या पद्धतीने विकास केला आहे त्याचे मी कौतुक करतो. त्यामुळेच मी पुन्हा भाजपमध्ये सामील होत असल्याचे मत आल्मेदा यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेस दिशाहीन पक्ष असल्याचे म्हणत, राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेस दिशाहीन झाल्याने ते उमेदवार ठरवू शकत नाहीत. प्रत्येकाला उमेदवार व्हायची इच्छा असल्याने ते स्वतंत्रपणे प्रचार करत आहेत. त्यांचा उमेदवार कोण असेल याची आम्हाला पर्वा नाही. गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांना भाजपात घ्यायचे की नाही. याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील. असेही तानावडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आल्मेदा पुन्हा भाजपमध्ये आल्याने राज्यातील अल्पसंख्यांक भाजपसोबत असल्याचा दावा मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. काँग्रेसला उमेदवार देखील जाहीर करता येईना, भाजप गोव्यात अधिककाळ राज्य करेल, असे माविन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT