Goa Congress helped the flood victims Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: पूरग्रस्तांना कॉंग्रेसने दिला मदतीचा हात

विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत , प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेस (Goa Congress) अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज सावर्डे भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) अनेक भागात पूराने (Goa Flood) हाहाकार माजवून शेकडो घरांचे नुकसान केले आहे. सावर्डे, सत्तरी, वाळपई, माशेल, होंडा, सावय वेरें तसेच इतर भागात लोकांचे भयंकर नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब सर्व पूरग्रस्ताना रोख मदत व एक महिन्याचे जीवनावश्यक सामग्री द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली.

विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज सावर्डे भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला व लोकांना जीवनावश्यक सामग्री, पाणी तसेच इतर वस्तुंचा पुरवठा करून मदत करण्याचा प्रयत्न केला.

सरकारने पाहणी अहवाल व इतर सरकारी सोपस्कारांची वाट न पाहता ताबडतोब लोकांना रोख रक्कम देणे गरजेचे आहे. लोकांचे कपडे, भांडी व इतर सर्व सामान पूरात वाहुन गेले आहे. काणकोण येथे पूर आला तेव्हा माझ्या सरकारने लोकांना रोख रक्कम देत दिलासा प्रयत्न केला होता. संकटकाळात लोकांना मदत देणे सरकारचे कर्तव्य आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारने त्वरित लोकांना सर्व प्रकारची मदत करावी अशी मागणी केली. काल दिल्लीहून गोव्यात पोचल्यानंतर मी थेट सत्तरी तालुक्यात गेलो व युवक कॉंग्रेस मार्फत लोकांना मदत देण्याचे प्रयत्न केले. युवक कॉंग्रेस आपले मदत कार्य सुरूच ठेवणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी काल व आज पूरग्रस्त भागात जातीने उपस्थित राहून मदत कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पूराने हाहाकार माजवला असुन, लोकांना मदत करणे आमची जबाबदारी आहे असल्याचे वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे पदाधिकारी संकल्प आमोणकर, जनार्दन भांडारी, अर्चित नाईक, साईश आरोसकर, मनोहर नाईक तसेच गट समित्यांचे इतर पदाधिकारी या मदत कार्यात काल व आज सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT