Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa politics : तवडकर यांना सभापती पदावरून हटवा; गिरीश चोडणकरांची मागणी

तवडकरांकडून नैतिकदृष्ट्या पदाचे अवमूल्यन

गोमन्तक डिजिटल टीम

रमेश तवडकर हे विधानसभेच्या सभापतिपदी असल्याने सक्रिय राजकारणापासून त्यांनी दूर राहायला हवे. मात्र, तवडकर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजर राहून नैतिकदृष्ट्या पदाचे अवमूल्यन करत आहेत. त्यामुळे विधानसभेची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तवडकर यांना सभापती पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

चोडणकर म्हणाले की, सभापती म्हणून निवडून आल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सर्व पक्षांना समान न्यायाची वागणूक देणे अपेक्षित असते. मात्र, नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एसटी मोर्चाच्या बैठकीस सभापती तवडकर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी तवडकर यांनी दुपारी जेवणाच्या वेळेत विधानसभा कामकाज तहकूब केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यावेळी एनडीएच्या उमेदवार होत्या. त्यावेळी सभापती तेथे उपस्थित राहणे, हाही औचित्यभंगाचा प्रकार होता. शिवाय ते पक्षाच्या बैठकांनाही हजर असतात.

सध्या त्यांच्याकडे भाजपच्या विरोधात आणि कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांच्या विरोधातील याचिका आहेत. ते या याचिकांना निष्पक्षपणे न्याय कसा देतील, असा सवालही चोडणकर यांनी केला आहे. तवडकर हे सभापती पदावर राहिल्यास गोव्यातील जनतेला न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. उलट त्यांना पक्षहितानुसार मार्गदर्शन केले जाईल आणि ते पक्षाच्या आदेशानुसार काम करतील, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT