Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: अखेर 'त्या' बंडखोर आठ आमदरांविरोधात अपात्रता याचिका दाखल

यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर याचिकार्ते आहेत.

Pramod Yadav

Goa Congress: काँग्रेसच्या आठ आमदारांनी सप्टेंबर 14, 2022 रोजी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. जवळपास तीन महिन्यानंतर अखेर कांग्रेसने 'त्या' बंडखोर आठ आमदरांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. काही माहितीसाठी आम्ही थांबलो होतो, त्यामुळे जरा उशिर झाला. अशी माहिती हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी दिली. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर याचिकार्ते आहेत.

आमदार लोबो, कामतांना सभापती तवडकरांची नोटीस

काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याचा अयशस्वी प्रयत्न काँग्रेस आमदारांकडून केला होता. यानंतर पक्षांतर रोखण्यासाठी काँग्रेसकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता माजी विरोधीपक्षनेते व कळंगुटचे आमदार मायकल लोबो (Michael Lobo) आणि माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी नोटीस दिली आहे. लोबो आणि कामत यांना 16 डिसेंबर रोजी आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनेकदा सभापती हे ठराविक राजकीय पक्षाचे नेते असतात, मात्र सभापतींनी नेहमीच निर्णय हे न्यायिक तत्वावर द्यायचे असतात. मुळात काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण झालेले नाही. पक्षाचा छोटासा गट दुसर्‍या पक्षात गेला म्हणजे संपूर्ण मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण झाले असे म्हणता येणार नाही. जर सभापतींनी याचिका फेटाळलीच तर न्यायालयात यास आव्हान देत विलिनीकरणाची खरी व्याख्या जाणून घेण्याची आमची तयारी आहे, असे अ‍ॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT