Mallikarjun Kharge Dainik Gomantak
गोवा

Mallikarjun Kharge Vehicle Attack: मल्लिकार्जुन खर्गेंच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या 'BJYM'कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवा; गोवा काँग्रेसची मागणी

Mallikarjun Kharge Vehicle Attack: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाहनावर काळे झेंडे दाखवत हल्ला करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती समितीने केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाहनावर काळे झेंडे दाखवत हल्ला करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती समितीने केली.

पणजी येथील गोवा प्रदेश काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी (ता. २१) समितीचे अध्यक्ष विठू मोरजकर, मोहन जाधव, आयुष केरकर, महेश मोचेमाडकर आणि जितेंद्र गावकर यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. दाबोळी विमानतळावर खर्गे यांच्या वाहनावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित हल्ल्याचा निषेध करताना मोरजकर यांनी संबंधित कार्यकर्त्यांना भाजपने योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली.

भाजपमध्ये आता शिस्त राहिलेली नाही. हा पक्ष माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांचा राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.ज्येष्ठ नेत्याच्या वाहनावर अशा प्रकारे तुटून पडणाऱ्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठांचा आदर राखला जात नसल्याचे मोरजकर म्हणाले.

खर्गे हे अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या वाहनावर झालेला हल्ला हा एका प्रकारे बहुजन समाजावर केलेला हल्ला असल्याचा आरोप मोरजकर यांनी केला. या प्रकरणी राज्य गृह विभागाने तातडीने एफआयआर दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT