Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

'असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारचा जनविरोधी अजेंडा उघड'

इंधन-एलपीजी दरवाढ आणि सरकार स्थापनेवरुन काँग्रेसने केले भाजपला लक्ष्य

दैनिक गोमन्तक

मडगाव : विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारचा जनविरोधी अजेंडा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा जनतेची सोय ही महत्त्वाची आहे, यासाठी गोव्यातील सरकारने शपथविधी कार्यक्रम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

इंधन आणि एलपीजी दरवाढ, तसेच गोव्यातील सरकारच्या शपथविधीला होणारा विलंब यावर प्रतिक्रिया देताना, कुंकळ्ळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एका संयुक्त निवेदनात भाजपच्या लोकविरोधी अजेंड्यावर टीका केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 5 मार्च 2022 रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत, ज्यात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर इंधनाच्या दरवाढीच्या अपेक्षेने लोकांना त्यांच्या इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याचे आवाहन केले होते. युरी आलेमाव म्हणाले ,की काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपची पोलखोल केली आहे.

'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उशिरा होइना पण आपण पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) जुमल्यांची पूर्तता केली आहे. एलपीजीच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी आणि इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाल्यामुळे आता स्मृती इराणींच्या उत्साही रोड शोची प्रतीक्षा आहे,' असा टोला युरी आलेमाव यांनी लगावला.

काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 28 मार्च 2022 रोजी आयोजित केलेल्या घोषणेवरही त्यांनी जोरदार टीका केली. 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा गोव्यातील जनतेची सुविधा सर्वोपरि आहे. गोव्यातील जनतेला ताबडतोब पूर्ण सरकार हवे आहे. इव्हेंट मॅनेजमेंटवर होणारा फालतू खर्च थांबवा आणि राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये ताबडतोब शपथविधी घ्या,' अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वीच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ करुन प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची क्रूर चेष्टा केली आहे, असा निशाणा कॉंग्रेस (Congress) नेते अमरनाथ पणजीकर यांनी साधला आहे. 'भाजपच्या निवडणुकीतील जुमल्यांचा पर्दाफाश झाला आहे,' असेही ते म्हणाले. जनतेला भाजपच्या जनविरोधी अजेंड्याबद्दल प्रश्न विचारण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT