Goa BJP & Congress Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: कोविड गैरव्यवस्थापनाबाबत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

भारतीय निवडणूक आयोगाने चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, उत्तर गोवा काँग्रेसचेअध्यक्ष विजय भिके यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

म्हापसा: राज्यातील वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करून व कोविडसंदर्भातील गैरव्यवस्थापनाच्या संदर्भात भाजप सरकारवर टीका करून गोव्यात निवडणुका सुरक्षितपणे पार पाडल्या जाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने चौकटीबाहेर जाऊन विचार करावा, असे आवाहन उत्तर गोवा काँग्रेसचे (Goa Congress) अध्यक्ष विजय भिके यांनी केले आहे. Congress criticizes Goa BJP government over covid mismanagement

कोविडची (Goa Covid-19) तिसरी लाट गोवा आणि उर्वरीत देशात नुकतीच सुरू झाली आहे याकडे लक्ष वेधून भिके यांनी भीती व्यक्त केली आहे की सर्वाधिक वाईट परिस्थिती अजून येण्याची बाकी आहे. यासंदर्भात त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. म्हापसा येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, एकंदर परिस्थिती बिकट होत चालली आहे. इतकी वाईट स्थिती आहे की कित्येक जण एकाच वेळी आजारी पडत आहेत. सर्व कर्मचारी एकाच वेळी आजारी पडल्यामुळे अत्यावश्यक आस्थापने बंद ठेवणे भाग पडत आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) काही उपाययोजना जाहीर केल्या असल्‍या तरी आयोगाने चौकटीच्या बाहेर विचार करणे आणि निवडणूक प्रक्रियेसाठी काही पर्यायी उपाय शोधणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांना डिजिटल पद्धतीने प्रचार करण्याचे आवाहन केले असले तरी मतदान प्रक्रिया स्वतःच डिजिटल केली गेली नाही. त्यामुळे मतदार असुरक्षित आहेत, असा दावाही भिके यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT