Goa Scandal Case Dainik Gomantak
गोवा

Goa Scandal: सेक्स स्कँडलबाबत चोडणकरांचा गौप्यस्फोट; 'अजूनही मी माझे ट्विट हटवले नाही, योग्यवेळी...

Goa Scandal Case: जर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्या मंत्र्याची ती ‘खासगी बाब'' असल्याचे म्हणत असतील तर मुख्यमंत्र्यांना सर्व काही माहीत असावे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Scandal Case: गेले काही दिवस राज्यात गाजत असलेल्या एका मंत्र्याच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाचे पुरावे आपण योग्यवेळी सादर करू, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी, मंत्र्याच्या सेक्स स्कँडलसंदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत का, अशी विचारणा केल्यानंतर चोडणकरांनी हे स्पष्टीकरण दिले.

या प्रकाराबाबत मला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले नाही, असे सांगून चोडणकर म्हणाले, मी कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतलेले नाही; परंतु जर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्या मंत्र्याची ती ‘खासगी बाब'' असल्याचे म्हणत असतील तर मुख्यमंत्र्यांना सर्व काही माहीत असावे.

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी चोडणकर यांनी 26 ऑगस्ट रोजी ट्वीट केले आणि त्या ट्विटसोबत एका इंग्रजी वृत्ताचे कात्रण होते, त्या वृत्तात एका मंत्र्याचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचे म्हटले होते. या वृत्तात कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नव्हते.

परंतु हा सर्व प्रकार आपल्या बदनामीसाठी होत असल्याचे स्पष्टीकरण देत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गुदिन्हो यांना क्लिन चिट दिली असली तरी चोडणकर मात्र या प्रकरणाला सतत वारा देत आहेत.

लोकसभेच्या तोंडावर प्रकरण चिघळण्याचे संकेत

मी सामान्य माणसाविषयी बोलत नाही, तर मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीकडून ते कृत्य घडले आहे. अजूनही मी माझे ते ट्विट हटविलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी खरे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी होती.

सर्व यंत्रणा हाताशी असल्याने त्यांनी या प्रकरणातील सत्य बाहेर आणायला हवे होते, असेही चोडणकर म्हणाले. तथापि, चोडणकर यांनी योग्यवेळी ते पुरावे सादर करण्याचे सूतोवाच केल्याने कदाचित लोकसभा निवडणुकीच्या काळात हे प्रकरण भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT